IPL 2024 (PBKS Vs CSK Match Live Score) : आज आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
पंजाबने गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर चेन्नईचा पराभव केला होता. आता बदला घेण्याचे चेन्नईचे लक्ष्य असेल, तर पंजाब संघाचे सीएसकेविरुद्ध विजयाचा षटकार लगवण्याचे लक्ष्य असेल. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांमध्ये फक्त पंजाब संघानेच विजय मिळवला आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफकीचा कौल हा पंजाब किंग्ज संघाच्या बाजूनं लागला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, सीएसकेचा कर्णधार रुतुराज गायकवाडने 11व्या सामन्यात 10व्यांदा नाणेफेक गमावली आहे.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL elect to bowl first against @ChennaiIPL
Follow the Match ▶️ https://t.co/WxW3UyUZq6#TATAIPL | #PBKSvCSK pic.twitter.com/ilFcGVDc8Q
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
मागील सामन्यात पंजाब किंग्जने चेपॉक येथे सीएसकेचा सात गडी राखून पराभव केला होता. घरच्या मैदानावर गेल्या तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव असल्याने संघ अडचणीत सापडला आहे. चेन्नईने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यांनी 5 सामने जिंकले आहेत आणि 5 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 4 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.