पुणे -जमिनीचे हक्कसोडपत्र व वाटपपत्राची नोंद करण्यासाठी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजारांची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रामकृष्ण तुळशीराम कारंडे (35) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
याप्रकरणी कारंडे याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला. कारंडे हे सोरतापवाडी ता. हवेली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या
जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्र करण्यासाठी लाच मागितली होती.