शिक्रापूर -हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथे लहान मुलांना पळवून नेण्याच्या उद्देशाने गावामध्ये फिरणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे नागरिक लागलेले असताना पळून गेलेल्या त्या संशयिताचा मृत्यू झाला आहे.
सोमनाथ हरिभाऊ खलसे (वय 45, रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर) असे त्याचे नाव आहे. हिवरे कुंभार येथे हा व्यक्ती मुलांना पळवून नेण्याच्या उद्देशाने फिरत होता, यावेळी काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करताना तो संशयित दुचाकीवरून कान्हूर मेसाई दिशेने पळून गेला.
दुपारी पोलीस पाटील बाबाजान शेख हे दुचाकीहून कान्हूर मेसाईकडे जात होते. त्यांना रस्त्याच्याकडेला दुचाकी पडलेली दिसली. मुलांना पळवून नेणारी हीच व्यक्ती असल्याचे शेख यांच्या लक्षात आले.