बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफने सोशल मीडिया अकाऊंटवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवरील या व्हिडीओत टायगर श्रॉफ हा तब्बल 220 किलो वजन उचलून हार्ड वर्कआऊट करत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसत आहे.
अलिकडेच त्याने पुलअप्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो पुलअप्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे फिट राहण्यासाठी टायगर विशेष मेहनत करत असल्याचं या व्हिडीओवरुन लक्षात येत आहे. त्यामुळे सध्या अनेक जण त्याच्या या मेहनतीचं कौतूक करत आहे.
सोबत त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात टायगर लोवर आणि ब्लॅक कलरच्या बनियानमध्ये दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक्सक्यू द वार क्राइज. 220 किलो वजनाचा अनुभव घेतला.’ यावर टायगरची मैत्रीण दिशा पाटणीने एक इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. दुसरीकडे त्याच्या आईने त्याला “पागल’ म्हटले आहे.