तैपेई, (तैवान) :– तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी सत्तारुढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Taiwan’s President Tsai Ing-wen quits as party chair after local elections) अलिकडेच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये विरोधी नॅशनॅलिस्ट पार्टीने काही प्रमुख ठिकाणी विजय मिळवला आहे. त्या पराभवाची जबाबदारी स्विकारून त्साई यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
चीनकडून हल्ल्याचा धोका वाढत असताना त्साई यांच्या राजीनाम्यामुळे तैवान पिछाडीवर गेल्यासारखे झाले आहे. त्साई इंग-वेन यांनी आपल्या पक्षाच्या प्रचारादरम्यान वारंवार चीनला असलेला आपला विरोध उघडपणे व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी चीनच्या वाढत्या धोक्याव्यतिरिक्त स्थानिक मुद्यांवर भर दिला होता.
U.S. FDA : जगातील सर्वात महाग औषधाच्या निर्मितीला मंजुरी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये
त्साई यांनी शनिवारी आपल्या पक्षअध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निवडणुकीतील पराभवामुळे इतर अनेक विषयांचा आढावा आपल्याला घ्यावा लागणार असल्याचे त्या म्हणाल्या. या स्थानिक निवडणुका होत्या. त्यामुळे चीनच्या धोक्याचा मुद्दा येथे गैर लागू होता, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.