जेद्दाह :- सौदी अरेबियामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरामध्ये आतापर्यंत दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. तर पूरामुळे राजधानी जेद्दाहमधील वाहनेही वाहून जाऊ लागली आहेत.
गुरूवारी सौदीमध्ये तब्बल 965 मि.मी. पाऊस झाला होता. सौदीतील पावसाच्या वार्षिक सरासरीपेक्षाही हा पाऊस जास्त आहे. या पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अद्याप कोणताही अंदाज व्यक्त केला जाऊ शकलेला नाही.
Taiwan : तैवानच्या अध्यक्षांनी ‘या’ कारणामुळे दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
सौदीमध्ये यापूर्वी नोव्हेंबर 2009 आणि जानेवारी 2011 मध्ये भीषण पूर आला होता. या दोन्ही पूरांमध्ये मिळून 10 हजार घरे आणि 17 हजार वाहनांचे नुकसान झाले होते. यंदाच्या पूरातही तशाच मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त होत आहे.