तैवानच्या अध्यक्षा त्साई इन वेन यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय

तैपेई : त्साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्‍याने तैवानच्या जनतेने त्यांच्या हाती सत्ता सोपवली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग पक्षाचे हान कुओ यू यांना मोठ्या मताधिक्‍याने हरवले. त्यांना 57 टक्के मते मिळाली तर हान कुओ यू यांना 38 टक्के मते मिळाली.

आम्ही आपल्या स्वतंत्र, लोकशाही जीवनशैलीची किती कदर करतो आणि आपण आपल्या राष्ट्राची किती कदर करतो, हे तैवान जगाला दाखवून देत आहे, असे त्साई इंग वेन यांनी पत्रकारांना सांगितले. तैवानमधील निवडणुकांचा निकाल म्हणजे बीजिंगला मोठा धक्का आहे, त्यामुळे त्साई यांना तैवानच्या बाहेर काढले जाईल आणि केएमटीने तिची जागा घ्यावी, ही चीनची महत्वाकांक्षा अपूर्णच राहणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून चीनने तैवानवर आर्थिक आणि मुत्सदी दबाव आणला होता. मात्र त्यामुळे त्साईंच्या विरोधकांना बळ मिळेल, अशी चीनची अपेक्षा होती. मात्र त्साई यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने चीनच्या ताठर भूमिकेला प्रखर विरोध केला.

हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनावर केलेल्या दडपशाहीचाही त्यांनी निषेध केला होता. चीनच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी उदार लोकशाही मूल्ल्यांचा जोरदार पुरस्कार केला होता.

चीन तैवानला आपल्या भूभागाचा एक भाग समजतो आणि एक दिवस जबरदस्तीने हे बेट पुन्हा ताब्यात घेण्याचा संकल्पही चीनने केला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.