मुंबई: पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कचऱ्याचा प्रश्न असला तरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय नगरसेवक पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच सोडवतील. तेथील रहिवाशांना दिलासा देतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. तेथील ग्रामस्थांशी चर्चा करताना कचरा उघड्यावर टाकून चालणार नाही, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय सुप्रिया सुळे या प्रश्नाकडे लक्ष देत आहेत. सत्ता येण्यापूर्वी अजित पवार यांनी अनेक वेळा लक्ष घालून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न देखील केला होता.