ओमान : चिराग सूरीच्या अर्धशतकी खेळीनंतर सुल्तान अहमदने गोलंदाजीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संयुक्त अरब अमीरातने एसीसी वेस्टर्न रीजन टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुवैतचा १०२ धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सुल्तान अहमद सामन्याचा मानकरी ठरला.
UAE ARE CHAMPIONS OF THE #WRT20 TOURNAMENT!
Kuwait are restricted to 97/7 in their 20 overs with Sultan Ahmad the pick of the bowlers scalping an incredible 4/9 in his 4 overs! #UAEvKUW #WRT20 pic.twitter.com/3cFwJ5BOdC
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) February 27, 2020
संयुक्त अरब अमीरातने प्रथम फलंदाजी करताना चिराग सूरीच्या ६०(४१), रोहन मुस्तफाच्या २८(२३), मुहम्मद उस्मानच्या २८(१९) आणि वहीद अहमदच्या नाबाद ४५(१५) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद १९९ धावा केल्या होत्या. कुवैतकडून गोलंदाजीत अफसाल अशराफने २ तर मोहम्मद असलम, प्रदीप वंसथा आणि शिराज खानने प्रत्येकी १ गडी बाद केला.
विजयासाठी २०० धावांचा पाठलाग करताना कुवैतच्या संघास २० षटकांत ७ बाद ९७ धावांपर्यतच मजल मारता आली. कुवैतकडून बिलाल ताहिरने २२(२०), रविजा संदारूवानने १२(१५), मुहम्मद अमीनने नाबाद १८(३१) आणि मोहम्मद असलमने नाबाद २३(२४) धावांची खेळी केली.
संयुक्त अरब अमीरात संघाकडून गोलंदाजीत सुल्तान अहमदने ४ षटकात ९ धावा देत ४, अहमद रजाने ४ षटकात ८ धावा २ तर जुनैद सिद्दीकीने ३ षटकात २२ धावा देत १ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.