पुणे – पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपी बससेवा आणखी सक्षम केली जाणार आहे. पुणेकरांना सुरक्षित, प्रदूषणमुक्त तसेच परवडणारी पीएमपी सेवा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
वानवडी, क्लोव्हर व्हिलेज, गंगा सॅटेलाइट, नेताजीनगर, हौसिंग बोर्ड, साळुंखे विहार या परिसरात मोहोळ यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. आमदार सुनील कांबळे, बाबू वागस्कर, कालिंदाताई पुंडे, धनराज घोगरे, दिलीप गिरमकर, मकरंद केदारी, दिनेश होले, सागर गव्हाणे, कोमल शेंडकर, सचिन मथुरावाला, तात्या शेंडकर, मारूती भद्रावती, नीलेश अशोक कांबळे, दिलीप जांभुळकर, प्रसाद चौघुले, मनोज चोरडिया, निशा कोटा, अतुल वानवडीकर, दिनेश सामल या फेरीत सहभागी झाले होते.
यावेळी या भागातील नागरिकांनी पीएमपीची सेवा सक्षम करण्याची मागणी मोहोळ यांच्याकडे केली. त्यावर “पुणे शहरात गेल्या दीड दशकांत नागरीकरण वाढले असले, तरी त्या तुलनेत शहरालगतची हद्द आणि उपनगरांमध्ये अद्यापही पुरेशी पीएमपी सेवा देण्यात अडथळे आहेत. मात्र, भविष्यात ही समस्या सोडविण्यावर आपला कायम भर राहणा आहे,’ असे मोहोळ यांनी या वेळी सांगितले.
“सार्वजनिक वाहतुकीसाठी देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. गेल्या पाच वर्षांत पीएमपीला केंद्र सरकारच्या फेम 2 योजनेअंतर्गत 150 ई बसेस मिळाल्या आहेत. अपेक्षित 650 ई बसेसपैकी 473 बसचा वापर सुरू झाला असून, उर्वरित बसेस लवकरच दाखल होणार असून शहराच्या चारही दिशांना सहा ई बस चार्जिंग डेपो कार्यान्वित करण्यात आले आहेत.
नजिकच्या काळात 500 सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू आहे. इलेक्ट्रिक बसमुळे वहनखर्चात 70 टक्केत तर कार्बन उत्सर्जनात 50 टक्के घट होते. मेट्रो नेटवर्कला फीडर सेवेवर भर देण्यात येणार आहे,’ असेही मोहोळ यांनी सांगितले.