वाघापूर-चौफुला येथे सुळेंसाठी प्रचारसभा
वाघापूर – या केंद्र सरकारने शेतक-यांचे उत्पादन कमी पण खर्च डबल केला. त्याचबरोबर पेट्रोल पंपावरचा हसरा चेहरा कशासाठी तर मोदींनी जनतेला कसे गंडवलं हे सांगण्यासाठीच ते आपल्याकडे पाहून हसतात, असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी केला.
वाघापूर-चौफुला (ता. पुरंदर) या चौकात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ नुकतीच रोहित पवार यांची सभा पार पडली, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली.
रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांनी कांदा निर्यात केला तर शेतकर्यांचा फायदा झाला. पण आता परिस्थिती खूपच वाईट असल्यास त्यांनी सांगितले. जेल पेक्षा भाजप बरा तुम्ही फक्त व्यक्तिगत विकासासाठी तिकडे गेलात असा टोलाही त्यांनी अजितदादांना लगावला. मी पण मंत्री झालो असतो पण मी शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाव न घेता राज ठाकरेंना टोला
सर्वात विशेष म्हणजे भाजपने फार मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेतला की ज्याच्याकडे एकच आमदार आहे. नव न घेता थेट राज ठाकरेंनाच टोला लगावला. यावेळी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, विजय कोलते, विकास लवांडे, सुदाम इंगळे, दत्तात्रय कड, प्रदीप पोमण, विकास इंदलकर, गौरी कुंजीर, शहानवाज शेख, बाजीराव कुंजीर, म्हस्कु खेडेकर, माऊली मेमाणे, सुरज गदादे आदींसह आंबळे, टेकवडी, माळशिरस, पौंढे, वाघापूर, सिंगापूर, गुरोळी, पारगाव, उदाचीवाडी, वनपुरी, सोनोरी आदी गावांतून आलेले नागरिक उपस्थित होते.