T20 WorldCup – झिम्बाब्वे संघाने टी-२० विश्वचषक इतिहासात स्पर्धेच्या सुपर-१२ मध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. पात्रता फेरीच्या ब गटातील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेने स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव केला. हा सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर खेळला गेला. सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्टॉकलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १३२ धावा केल्या. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सीने शानदार ५४ धावांची अर्धशतकीय परी खेळली. मात्र त्याला इतर कोणत्याही सहकारी फलंदाजाकडून फारशी मदत मिळाली नाही.
विराट आणि सूर्यकुमार नव्हे तर ‘हा’ पाकिस्तानी बॅट्समन करेल सर्वाधिक धावा, सेहवागने केली भविष्यवाणी
झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांनी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. तेंडाई चत्रा याने ४ षटकांत १४ धावांत २ गडी बाद केले. अष्टपैलू सिकंदर रझाने ४ षटकात २० धावा देत १ बळी घेतला. तर रिचर्ड नागरवा याने ४ षटकात २८ धावा देत २ बळी घेतले. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघाकडून फलंदाजीत कर्णधार क्रेग एर्विनने ५४ चेंडूत शानदार ५८ धावा केल्या. सिकंदर रझाने २३ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. सामन्यातील दमदार कामगिरीच्या बळावर झिम्बाब्वेने १८.३ षटकांत ५ गडी गमावून सामना जिंकला. ( T20 WorldCup )
Zimbabwe are through to the Super 12 after a fabulous performance in Hobart 👏🏻
The first time they have made it out of the First Round at the #T20WorldCup 🔥#SCOvZIM pic.twitter.com/W1snTvtwch
— ICC (@ICC) October 21, 2022
टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup ) स्पर्धेत २२ ऑक्टोबरपासून सुपर-१२ मधील सामने सुरु होणार आहेत. त्यामुळे आता या १२ संघांमध्ये विजेतेपदासाठीची खरी चुरस पाहायला मिळणार आहे. सुपर-१२ मध्ये खेळणाऱ्या सर्व संघांची नावे आता निश्चित झाली आहेत. ज्यामध्ये श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या संघांनी पात्रता फेरीतील सामन्यांद्वारे सुपर-१२ मध्ये स्थान मिळवले आहे. सुपर-१२ मध्ये आठ संघांनी आधीच जागा मिळवलेली होती. ज्यामध्ये अ गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ तर ब गटात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे.
सुपर-१२ च्या पहिल्याच सामन्यात २२ ऑक्टोबरला क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील लढत पाहायला मिळणार आहे. २३ ऑक्टोबरला स्पर्धेतील मोठी लढत म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. ( T20 WorldCup )