ENG vs PAK – टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगलीच झुंज दिली. मात्र, बेन स्टोक्सच्या शानदार फलंदाजीमुळे इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. स्टोक्सने ४९ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावांची खेळी केली.
ENGvsPAK | बाबर आझमने पराभवाचं खापर ‘या’ खेळाडूवर फोडलं, म्हणाला…
सामान्यांच्या ( ENG vs PAK ) सुरुवातीला नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य १९ षटकांत ५ गडी गमावून १३९ धावा करत विजेतेपद जिंकले. या पराभवाने पाकिस्तानच्या चाहत्यांना मोठे दुःख झाले आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानचे चाहते दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
Pakistani fan get cry after losing the game #PakVsEngFinal #BibleBuild #chacha #BabarAzam #pakistan pic.twitter.com/mGkQhSY50K
— Rashid (@Rashid55667876) November 13, 2022
इंग्लंडने १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला होता. आता ३० वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव केला आहे. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचा चॅम्पियन बनला आहे. याआधी इंग्लंड २०१० मध्येही टी-२० विश्वचषकाचा विजेता बनला होता. तेव्हा पॉल कॉलिंगवूड हा इंग्लंड संघाचा कर्णधार होता.
Today God were on @RishiSunak side 🎊🎉
pic.twitter.com/g6xfaT4WPt | #PKMKBForever #EngvsPak 🤣🤣🤣🤣— mamta Nigam !!! (@mamtan14) November 13, 2022
The most painful picture of the year for Pakistan Cricket Fans. pic.twitter.com/irLHrXWPqD
— اَسَدٔ 🦁 (@itsmeasadkamran) November 13, 2022
As the TV was broken on the first match, Pakistan fans today : pic.twitter.com/VOAUHVmRU9
— 𝙎𝘼𝙍𝘾𝘼𝙎𝙌𝙊 (@sarcasqo) November 13, 2022