टी-२० विश्वचषक २०२२च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. अखेरच्या काही षटकात शाहिद आफ्रिदीला दुखापत झाली नसती तर निकाल वेगळा लागला असता, असे कर्णधार बाबर आझमने ( Babar Azam) सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत बाबरला आयपीएलबाबत प्रश्न विचारला असता त्याने त्यावर मौन बाळगले. एव्हढेच नाही तर बाबरऐवजी पाकिस्तानी संघाच्या मीडिया मॅनेजरवर मध्येच हस्तक्षेप करण्याची वेळ आली.
इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने दिला IPL खेळण्यास नकार, ‘हे’ कारण आले समोर
बाबरला ( Babar Azam ) एका पत्रकाराने विचारले होते की, “अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळण्याचे फायदे सांगितले आहेत. त्यामुळे हि एक अशी बाब आहे का ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या संघालाही मदत झाली असती? तुला भविष्यात आयपीएल खेळण्याची काही आशा आहे का?” असा प्रश्न ऐकून बाबर थोडा वेळ एकदमच शांत झाला. तो त्यांच्या टीमचा मीडिया मॅनेजरकडे पाहू लागला. त्यानंतर त्या मॅनेजरने मध्यस्थी करत पत्रकाराला म्हटले की, “तुम्ही टी-२० वर्ल्ड कपशी संबंधित प्रश्न विचारले तर बरे होईल.”
पराभवानंतर कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) म्हणाला की, “फलंदाजांनी २० धावा कमी केल्या आणि शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीने संघाला शेवटच्या क्षणाला साथ दिली नाही. आमची गोलंदाजी जगातील सर्वोत्तम आहे. पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती उत्कृष्ट होती. दुर्दैवाने शाहीन आफ्रिदीला दुखापत उद्भवली. त्याच्या दुखापतीने आम्हाला जास्त त्रास दिला. नाहीतर या सामन्याचा निकाल कदाचित वेगळा पाहायला मिळाला आसता. असुद्या, हा खेळाचा एक भाग आहे.”
In the #T20WorldCupFinal pre match press conference, Babar Azam was asked about what it’s like to not play the IPL.
He completely ignored the question. pic.twitter.com/4RhE6dlJFg
— Change of Pace (@ChangeofPace414) November 12, 2022
सामान्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा करत सामना जिंकला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.