T20 WorldCup – टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. हा सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंड संघाला 1.6 मिलियन डॉलर (भारतीय चलनात सुमारे 13.05 कोटी रुपये) मिळाले आहेत. तर फायनलमध्ये हरलेल्या पाकिस्तान संघाला 8 लाख डॉलर ( भारतीय चलनात सुमारे 6.52 कोटी रुपये)मिळाले आहेत. याशिवाय आयसीसीने या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही मालामाल केले आहे.
#ENGvsPAK | “पाकिस्तान हार गया…”सामना हरल्याने चाहत्याला भावना अनावर
टी-20 विश्वचषक ( T20 WorldCup ) स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 5.6 मिलियन डॉलर (भारतीय चलनात सुमारे 45.68 कोटी रुपये) एव्हढी ठरवण्यात आली होती. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना ठराविक रक्कम बक्षीस म्हणून दिलीगेली आहे. पहिल्या फेरीत बाहेर पडलेल्या संघांना 40 हजार डॉलर ( भारतीय चलनात सुमारे 32.63 लाख रुपये) अशी रक्कम दिली गेली आहे. यामध्ये नामिबिया, युएई, वेस्ट इंडीज आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या भारत आणि न्यूझीलंड संघांना प्रत्येकी 4 लाख डॉलर (भारतीय चलनात सुमारे 3.6 कोटी रुपये) एव्हढी रक्कम मिळाली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला सुपर-12 फेरीत चार सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 32.62 लाख रुपये मिळाले आहेत. असे सर्व मिळून भारतीय संघाला सुमारे 4.56 कोटी रुपये मिळाले आहेत.