IND vs ENG – टी-२० विश्वचषकच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि इंग्लंड गुरुवारी ऍडिलेडमध्ये आमने-सामने होते. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने २० षटकात ६ गडी गमावत १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने १६ षटकांत एकही विकेट न गमावता १७० धावा केल्या. सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा तब्बल १० गडी राखून पराभव केला आहे.
IND vs ENG | विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १६ षटकात एकही गडी न गमावता १७० धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीला अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत ८० धावा केल्या. यादरम्यान भारताच्या सहापैकी चार गोलंदाजांनी तब्बल १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या. भारतीय संघाची ढेपाळलेली गोलंदाजीच पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडविरुद्ध १६८ धावा उभारल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड संघासमोर १६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने अर्धशतकीय खेळी केली. त्याच्याशिवाय विराट कोहलीने ४० चेंडूत ५० धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही.
The highest partnership in #T20WorldCup history inspires England to a stunning win over India in the semi-finals in Adelaide 😍#INDvENG | 📝: https://t.co/PgKzpNrdvB pic.twitter.com/F9nyZpHdSg
— ICC (@ICC) November 10, 2022
टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाईल. या दोन्ही संघांनी त्यांच्या सेमीफायनलच्या सामन्यांत मोठे विजय मिळवले आहेत. पहिल्यांदा पाकिस्तानने न्यूझीलंडला ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर आता इंग्लंडने भारताचा तब्बल १० गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.