नगर – दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अमोल नामदेव धोत्रे (वय-28, रा. इंदिरानगर पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे.
अकोळनेर-सोनवाडी रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (दि.24) रोजी ताब्यात घेतले होते. यावेळी दोघे जन आंधाराचा फायदा घेत पळून गेले होते. यातील एका जनाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार धोत्रे हा पाथर्डी येथील घरी येणार असल्याचे खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. ही कारवाई सोन्याबापू नानेकर, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, प्रकाश वाघ, रणजित जाधव, जालिंदर माने, दीपक शिंदे यांच्या पथकाने केली. आरोपीस पुढील तपासाठी धोत्रे यास कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.