नगर – शहरात झालेल्या संततधार पावसाने शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे पॅचिंगचे काम मनपा प्रशासनाने लवकरात लवकर करावे अशा मागणीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यासाठी नगरसेवक योगीराज गाडे गेले असता त्याठिकाणी एकही अधिकारी नसल्याने गाडे यांनी आयुक्तांच्या दालनाला निवेदन चिकटवून निषेध व्यक्त केला. व लवकरात लवकर काम न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. Petition filed by Commissioner’s office as there is no Municipal Officer
यावेळी अतुल गाडे, प्रशांत बोरा, ऋषिकेश काकडे, शुभम पवार, शुभम गाडे, गिरीष शर्मा, संगमनाथ चांदकोटे आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हंटले की, शहरात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालने ही मुश्किल झाले असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. मनपा प्रशासनाकडून चांगल्या दर्जाचे पॅचिंग पावसाळा सुरु होण्या अगोदरच होणे अपेक्षित होते.
जनतेने भरलेल्या कराच्या पैश्यातूनच ही कामे होतात. त्यामुळे ही कामे चांगल्या दर्जाची होणे अपेक्षित आहे. दिल्लीगेट, न्यू आर्टस कॉलेज, पाइपलाइन रोड, गुलमोहर रोड, मिस्कीन मळा रोड, सर्जेपुरा शहरातील मध्य भाग व उपनगरात सर्व ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्त्ये आहेत, अशी परिस्थिती झालेली आहे. लवकरात लवकर शहरातील रस्त्यांचे पॅचिंगचे कामे करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल.