सुषमा स्वराज यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली

नवी दिल्ली : भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी येताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच भाजपच्या सर्व नेत्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही ट्‌विटर अकाऊंटवरुन सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्‍त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्या भाषाशैलीच्या जोरावर सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात संसदेमध्ये सर्वांची मन जिंकून घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू सुषमा स्वराज यांनी अतिशय कणखरपणे मांडली. अनेकदा सुषमा स्वराज यांच्यावर आरोपही झाले, मात्र प्रत्येकवेळी स्वराज यांनी संयम न सोडता प्रत्येक आरोपांना योग्य आणि समर्पक उत्तर दिलं होतं. स्वराज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही नेटीझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.