दिल्लीने वर्षभरात गमावले तीन माजी मुख्यमंत्र्यांना

नवी दिल्ली – सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे दिल्लीने वर्षभरापेक्षा कमी कालावधीत तीन माजी मुख्यमंत्री गमावले. सुषमा यांनी ऑक्‍टोबर ते डिसेंबर 1998 अशा अल्पकाळासाठी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भुषवले. त्यांच्याआधी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन झाले. त्यांनी सलग तीन कार्यकाळांसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्या दोन्ही महिला नेत्यांचे महिभरापेक्षा कमी कालावधीच्या अंतरात निधन झाले. तर आणखी एक माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये निधन झाले. भाजपचे नेते असणारे खुराणा 1993 ते 1996 या कालावधीत मुख्यमंत्रिपदावर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.