मुंबई : मागील काही दिवसांपासून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात शाब्दिक चकमक होत असून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून भाजपला देखील टार्गेट करण्यात येत आहे. यात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचाहि समावेश आहे. वेळोवेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. त्याच्या याच टीकेला भाजपकडून बोचऱ्या टीकेच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले आहे.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी एक ट्विट केले आहे. यातून त्यांनी सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंत यांच्याशी केली आहे.
सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …
एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..
दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा
सनसनी कौन मचाई गा !— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) April 6, 2023
ते आपल्या ट्विटमध्ये,”सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी आहेत. एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दुसरी बहिण महाराष्ट्राच्या सिनेमात… दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यात कोण जास्त खळबळ माजवतं याची रोज स्पर्धा सुरू असते.” असे म्हणताना दिसत आहेत.