मुंबई – येत्या काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील अशी चर्चा काही पासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे. याच चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यातच एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत देतांना शरद पवार म्हणाले, ‘माझ्या माहितीप्रमाणे, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट नॅशनल पॉलिटिक्समध्ये आहे, पार्लमेंटमध्ये आहे. त्यांना सर्वोत्तम संसदपटूचे पुरस्कारही मिळालेत आहेत. इंटरेस्ट राज्यात नाही.’ ते पुढे म्हणाले,‘प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट त्यांचा तिथे आहे.’
दरम्यान , सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील अशी चर्चा काही काळापासून राज्याच्या राजकारणात सुरू असतांना शरद पवार यांनी या चर्चेला आता मात्र पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.