मुंबई – कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींवर उपासमारीची वेळ आली. सामान्य लोकांपासून तर कलाक्षेत्राला सुद्धा लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकंदर सांगायचं झालं तर लॉकडाऊनमुळं सर्वच क्षेत्रात कामाच्या संधींवर परिणाम झाला आहे. याला मनोरंजन क्षेत्र देखील अपवाद नाहीए.
या काळात अनेक मालिका आणि सिनेमाचं काम बंद पडलं. अनेक कलाकारांकडे कामही नाही. मराठी अभिनेता ‘अस्ताद काळे’ हाही कामाच्या शोधात आहे. अस्तादनं सोशल मीडियावर एक शेअर करत आपण कामाच्या शोधात असल्याचं म्हटलं आहे.
https://www.facebook.com/aastadsunitapramod.kale/posts/3407490262706230
“नमस्कार मी सध्या काम (अभिनय/सूत्रसंचालन) शोधतो आहे. माझ्या योग्य भूमिका असल्यास नक्की विचार करा. असं अस्तादनं आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे. दरम्यान, आस्तादची अशी पोस्ट पाहून चाहत्यांनी मात्र त्याला लवकरच काम मिळेल,असं म्हणत त्याच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आहे.
https://www.facebook.com/aastadsunitapramod.kale/posts/3127032770751982