Supriya Sule : सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाने गतवर्षीपासून ग्राहकांना आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदा मात्र दिवाळीचा शिधा आणि दर महिन्याचे मोफत धान्य अशा दुहेरी पद्धतीने शिधा देण्याचे काम दिवाळीच्या चार दिवसांपासून पूर्वीपासून प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाले; मात्र यंदा आनंदाचा शिधा याची पावती तसेच दरमहा दिले जाणारे धान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ डाळ या सर्व धान्याचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टवर पोस्ट शेअर करत राज्य सरकार टीका केली आहे. तेल निकृष्ट आणि किडलेल्या डाळी चे फोटो शेअर करत सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट
गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला ‘आनंदाचा शिधा’ हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध.