Priyanka gandhi on PM Modi – मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (MP Vidhansabha Election) प्रचारासाठी प्रियंका गांधी आज म्हणजेच (१५ नोव्हेंबर) रोजी दतिया येथे पोहोचल्या होत्या. जिथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित करत भाजपवर निशाणा साधला. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पीएम मोदी, सीएम शिवराज सिंह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.प्रियांका यांनी सलमान खानच्या तेरे नाम चित्रपटाचा दाखल देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
प्रियांका गांधी यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman khan) चित्रपट ‘तेरे नाम’चा (Tere Nam) उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला. प्रियांका म्हणाल्या, नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवायला हवा. या चित्रपटाला ‘मेरे नाम’ असं नाव द्यायला हवं.मोदींबद्दल काही विचारू नका, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? ते देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत, जे नेहमी त्यांचं स्वतःचं रडगाणं गात असतात. ते कर्नाटकला गेले तर तिथे त्यांनी यादी वाचून दाखवली. म्हणाले, लोक मला शिव्या देतात. ते नेहमी रडत असतात. (Priyanka gandhi tere nam pm modi)
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या,तुम्ही सलमान खानचा ‘तेरे नाम’ चित्रपट पाहिला असेल. त्या चित्रपटात सलमान खानचं पात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ रडत असतं. तशीच आपल्या मोदींची अवस्था आहे. (Priyanka gandhi on bjp)
“मला असं वाटतं, नरेंद्र मोदींवर एक चित्रपट बनवायला हवा. त्याचं नाव ‘मेरे नाम’ असं ठेवू. लोकांना पारखण्याची मोदींची दृष्टी उच्च दर्जाची आहे. त्यांनी जगभरातून भित्रे आणि गद्दारांची फोज गोळा केली आहे. या सगळ्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं आहे. हे सगळं पाहून मला भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावंत कार्यकर्तांची कीव येते. कारण या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी संघर्ष केला आहे.” अशी टीका देखील यावेळी प्रियांका यांनी केली.