Supriya Sule – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीनंतर प्रथमच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील नव्याने उभारणी केलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन व नामकरण सोहळ्याचा नुकताच कार्यक्रम पडला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar) , उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय हे उपस्थित होते.
एका मंचावर सुमारे दीड तास असूनही शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये कुठलीही चर्चा किंवा संवाद झाला नसल्याचं यावेळी पाहायला मिळाला.
दरम्यान, याबाबत आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमच्यात विचारांची प्रगल्भता आता आली आहे. प्रत्येकाची एक वैचारिक बैठक असते आणि एक कौटुंबिक असते. आमची लढाई भाजपच्या विचारधारे विरोधात आहे. त्यांच्या धोरणांच्या विरोधात आमची लढाई आहे.
ही लढाई वैचारिक आहे पण ही वैयक्तिक लढाई नाहीये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली मात्र बोलणं झालं का?, असं विचारण्यात आलं तेव्हा डायलॉग इस मस्ट!, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.