World Cup 2023 Pakistan vs Afghanistan Match Live Score : विश्वचषकाच्या 22व्या सामन्यात पाकिस्तानसमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. गेल्या दोन सामन्यांत पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलियानेही त्याचा पराभव केला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानला गेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, इंग्लंडचा पराभव करत अफगाणिस्तान संघानं स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने त्यांंना कमी लेखणे चूकीचे ठरेल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानला तिसरा धक्का…
पाकिस्तान संघाला 24.4व्या षटकात 120 धावसंख्येवर लगेचच तिसरा धक्का बसला. नूर अहमदने मोहम्मद रिझवानला मुजीबकरवी झेलबाद केले. रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या.
Noor has ✌️!@Noor_Ahmad_15 strikes again as Mohammad Rizwan miscues his sweep to Mujeeb at short fine. 👏
🇵🇰- 120/3 (24.4 Overs)#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvPAK | #WarzaMaidanGata pic.twitter.com/n769DvcG6h
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 23, 2023
त्याआधी, पाकिस्तानला 110 धावांवर दुसरा धक्का बसला. 23व्या षटकात नूर अहमदने अब्दुल्ला शफीकला एलबीडब्ल्यू आऊट केले. शफिकने 75 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.
अब्दुल्ला शफीकचे अर्धशतक
पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीकने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 19व्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानला पहिला धक्का…
पाकिस्तानला पहिला धक्का 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बसला. अजमतुल्लाने इमाम उल हकला नवीन उल हककरवी झेलबाद केले. इमाम 22 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्याने अब्दुल्ला शफीकसोबत पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने संघात एक बदल केला. मोहम्मद नवाजच्या जागी उपकर्णधार शादाब खानचे पुनरागमन झाले आहे. तापामुळे नवाज या सामन्यात खेळू शकला नाही.
#PAKvsAFG दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे :-
अफगाणिस्तान :- रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, नूर अहमद.
पाकिस्तान :- अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.