सोलापूर – माझ्या भावाच्या घरी कधीच ईडीची रेड झाली नाही, पण, माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आली आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला आहे. सोलापूर दोऱ्यावर असतांना सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधल त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाढव्याच्या सभेत अजित पवारांच्या घरावर इडीची रेड होते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही असा आरोप केला होता. त्यावर राज ठाकरे यांचे नाव घेता सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही. कदाचित त्या लोकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यांचा बेसच चुकीचा आहे, त्यामुळे कंपॅरिझनचा प्रश्नच येत नाही. उलट मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण देते, त्यामुळे माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आली आहे. असा खुलासा आज सुळे यांनी सोलापूरात पत्रकारांशी बोलताना केला आहे.