मुंबई – मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून टीका केली जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत खाज ठाकरे असा उल्लेख केला. तसेच भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे म्हणत त्यांनी स्टेजवर हनुमान चालीसा म्हणली. इस्लामपूरातील एनसीपीच्या परिवार संवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांचीही नक्कल केली.
बाजारु मटण करीची #औकात सगळ्यांना माहित आहे … त्यामुळे त्याने लायकी आहे तेवढंचं बोलावं…
‘कहा राजा भोज… ? कहा गंगू … pic.twitter.com/Q7bpyQogae— Gajanan Kale (@GajananKaleMNS) April 20, 2022
त्यांच्या या भाषणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत खाज ठाकरे असा उल्लेख केला. यावरून आता मनसे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. सभेमध्ये एका दमात हनुमान चालीसा म्हणणाऱ्या मिटकरी यांच्यावर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधलाय.
ट्विटवर व्हिडिओ शेअर करत गजानन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. ‘दादा’, ‘साहेब’ आणि ‘ताई’ असा उल्लेख करत काळे यांनी मिटकरींनी त्यांच्या नेत्यांनाही हनुमान चालीसा पठणासंदर्भात प्रश्न विचारावा असं काळे म्हणालेत.
तत्पूर्वी, “पेट्रोल, गॅस, डिझेलवर राज ठाकरे बोलत नाहीत. नकला करतात…चांगला टाइमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं,” असा टोला यावेळी अमोल मिटकरींना लगावला होता.