सध्या सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींजचे हॅलोवीन लूक व्हायरल होत आहेत. बॉलीवूडमधीलही अनेक कलाकारांनी आपले हॅलोवीन लूक शेअर केले आहेत. यात सनी लियोनी आणि तिच्या कुटुंबीयांचा फनी लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोंचे अनेकांनी कौतुक केले आहे.
सनी लियोनीने शेअर केलेल्या फोटोत तिच्यासह पती डेनियल वेबर आणि तिचे तिन्ही मुलेही दिसत आहेत. सध्या सनी लियोनी लॉस एंजेलिस स्थित आपल्या घरी असून अमेरिकेत हॅलोवीनची खूप धम्माल सुरू आहे. या हॅलोवीनचा सनी लियोनीनेही भरपूर आनंद लुटला.
या लुक्सबाबत सांगायचे झाल्यास सनी लियोनी ब्राइट कलरमध्ये दिसत आहे. तिने आकाशी रंगाचा साटिन फ्रॉक आणि गुलाबी रंगाची लेगिंग परिधान केलेली आहे. तसेच तिने घातलेली टोपी तिच्या फनी लुकला साजेशी दिसते. दुसरीकडे डेनियलही एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. यात त्याने मोठया फ्रेमचा चश्मा घातलेला आहे.
सनी लियोनीची मुलेही रंगीबेरंगी ड्रेसमध्ये दिसत आहेत. तिची मुलगी निशा ही सिल्व्हर व्हाइट लेगिंग आणि विंग्स टॉपमध्ये झळकली आहे. डेनियलने हे फोटो शेअर करत “हॅप्पी हॅलोवीन’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत.