Rakul Preet Singh-Jackky Bhagnani : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लवकरच आपला बायफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 21 फेब्रुवारीला रकुल आणि जॅकीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अभिनेत्रीच्या घरी प्री-वेडिंग पंक्शनला सुरुवात झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात पार पडणार आहे. अभिनेत्रीच्या घरी आता प्री-वेडिंग फंक्शनला देखील सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जॅकी भगनानी हा लोकप्रिय सिनेनिर्माता असून, त्याने अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे.
दरम्यान, आपल्या लग्नाविषीयी या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 19 फेब्रुवारीपासून लग्नसोहळा सुरू होणार आहे. या जोडप्याने आधी परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना भारतातच लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रकुल प्रीत आणि जॅकीनं आपला निर्णय बदलला.
रकुल प्रीत सिंहच्या घरी पार पडलं अखंड पाठ
काही दिवसांपूर्वी रकुल प्रीतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. अभिनेत्रीच्या घरी अखंड पाठ पार पडलं असल्याचं यातून दिसून आलं. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाची ओढणी डोक्यावर घेतली. अभिनेत्रीच्या हॅपी सेल्फीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास….
रकुल ही ‘छत्रीवाला’ आणि ‘आय लव्ह यू’ या चित्रपटात दिसली होती. 2024 मध्ये ती ‘मेरी पत्नी का रीमेक’ आणि ‘इंडियन 2’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर जॅकी भगनानी हा लोकप्रिय सिनेनिर्माता आहे. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.