सुनील शेट्टीने ‘या’ वेगळ्या स्टाईलने केला स्वातंत्र्यदिन साजरा

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी 5 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होता. मात्र आज ही त्यांच्या अभिनय प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या अभिनयाप्रमाणे ते व्यक्तिगत आयुष्यातील सामाजिक कामासाठी नेहमीच चर्चेत असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सुनील शेट्टी यांनी 73व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये विद्युत रोषणाईद्वारे ध्वजारोहण केले आहे. शेट्टीने याबाबत ट्विट केले आहे की,’आयकॉनिक एम्पायर स्टेट बिल्डिंगवर भारतीय तिरंगाची आश्चर्यकारक उपस्थिती या इमारतीत भारतीय तिरंगा विद्युत रोषणाईद्वारे ध्वजारोहण मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. जय हिंद! ”

सुनील शेट्टी लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याच्या जोरदार तयारीत आहे. त्याच्या आगामी चित्रपटातील लुक पाहता, ते दिसून येते. डायरेक्‍टर प्रियदर्शन यांच्या आगामी बीग बजेट असलेल्या “मरक्‍कड – द लॉयन ऑफ अरेबियन सी’ चित्रपटात सुनील 16व्या शतकातील एका योद्धाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट नेव्ही चीफ मोहम्मद अली उर्फ कुंजली मरक्‍कड 4 यांच्या जीवनावर आधारित आहे.

हा चित्रपट अनेक भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात मल्यालम सुपरस्टार मोहनलालही झळकणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 150 कोटींचे असणार आहे. सुनील आणि प्रियदर्शन यांचा हा ड्रीम प्रॉजेक्‍अ असून दोघेजण 10 वर्षांनंतर पुन्हा एकत्रित काम करत आहे. सुनीलचा लुक हा हॉलिवूडमधील “ट्रॉय’सारखा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)