तमिळ थलाईवाज वि. बंगळुरू बुल्स
स्थळ-अहमदाबाद
वेळ रात्री 7-30 वा.
अहमदाबाद – तमिळ थलाईवाज संघाला आज येथे बंगळुरू बुल्सच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी आतापर्यंत सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. राहुल चौधरी, अजय ठाकूर, शब्बीर बापू, मनजित चिल्लर अशी मातब्बर खेळाडूंची मांदियाळी असूनही त्यांना कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. सांघिक कौशल्याच्या अभावी त्यांना तीन सामन्यांमध्ये विजयाने हुलकावणी दिली आहे.
बंगळुरू संघाची स्थिती फारशी वेगळी नसली तरी त्यांनी सात सामन्यांमधील चार सामने जिंकले आहेत. रोहितकुमार व पवनकुमार यांच्यावर त्यांच्या चढायांची मुख्य मदार आहे. थलाईवाजचे खेळाडू त्यांच्या चढाया कशा रोखतात यावरच या सामन्याचा निकाल अवलंबून असेल.