ठाणे: महाराष्ट्राचा स्टार खेळाडू सनील शेट्टीने युटीटी राष्ट्रीय रॅंकिंग टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सनीलने संपूर्ण स्पर्धेत चमक दाखवली. पण, पुरुष एकेरी गटात त्याला पीएसपीबी व भारताचा अव्वल मानांकित खेळाडू मानव ठक्करकडून पराभूत व्हावे लागले. सनीलला 1-4 (4-11, 8-11, 11-8, 2-11, 9-11) अशा पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी स्पर्धेत सनीलने सौरव सहा व जीत चंद्रा यांना अनुक्रमे उपांत्यपूर्व व उपांत्यफेरीत 4-0 अशा फरकाने नमविले.
महिला एकेरीत महाराष्ट्राच्या दिया चितळेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दियाने उपांत्यपूर्व फेरीत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या निखत बानूला 4-3 अशा फरकाने पराभूत करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला. पण, उपांत्यफेरीत भारताच्या सहाव्या मानांकित रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या स्रीजा अकुलाकडून तिला 0-4 असे पराभूत
व्हावे लागले.