भिगवण – उजनी धरणात पाण्याचा साठाही अद्याप टिकून असल्याने भिगवण (ता. इंदापूर) परिसरात मोठ्या प्रमाणात आडसाली ऊस लागवडीस सुरुवात झाली आहे.
भिगवण, तक्रारवाडी, डाळज नं.- 1, 2, 3, भादलवाडी, मदनवाडी, कुंभारगाव, पोंधवडी, अकोले आदी गावांमध्ये लागवड सुरू आहे.
आडसाली, पूर्वहंगामी, सुरू यापैकी आडसाली हंगामात सर्वाधिक ऊस उत्पादन मिळते. करोनाची चिंता सतावत असताना शेतकरी लागवडीत गुंतला आहे.