राहुरी – व्हाट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्या. ही घटना तांदूळवाडी येथे दि. २४ मे रोजी घडली. या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करत अनेक तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर फिर्याद दाखल करण्याची मागणी केली.
अमोल चंद्रभान पेरणे या तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी आयुब लालखान पठाण याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करीत आहेत.