सिंहगड रस्ता – सिंहगड घाट तीन दिवस बंद होता, शुक्रवारी (दि.२४) घाट सुरू करण्यात आला. मात्र, दरडी कोसळू नयेत यासाठीचे काम अद्याप उर्वरित असल्याने आणखी महिनाभर गड बंद ठेवण्यासाठी स्थानिकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे भांबुर्डा वन विभागातील अधकाऱ्यांनी सांगितले.
वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिंहगड घाट रस्ता दि.२१ ते दि.२३ मे गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. घाट रस्ता सुरु करण्यात आल्यानंतर ठिसूळ दरडी कोरण्याचे काम सुरू होते. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा वाहतूक बंद ठेवावी लागली. घाट रस्त्याचा शेवटच्या तीन किलोमीटरचा रस्ता अरुंद आहे.
या ठिक़ाणी रस्त्याच्या कामासाठीचे साहित्य वाहून नेणारी अवजड वाहने जात-येत असल्याने घाटातील एका बाजूने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरडी कोसळण्यावर उपाययोजना करण्यासाठी सिंहगड घाट रस्ता पुन्हा बंद ठेवावा लागणार आहे परंतु, तत्पूर्वी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या चार दिवसांत पर्यटकांची संख्या मोठी असल्याने घाट सुरू ठेवता येईल का, याविषयी चर्चा करून निर्णय घेतला जाइल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
“सिंहगड घाट रस्त्याचे काम सुरू असले तरी वाहने जाण्यासाठी रस्तो मोकळा करून रविवारी दि. २६ मे अनुक्रमे पर्यटकांची वाढतील संख्या लक्षात घेता रविवारी घाट रस्ता पर्यटकांसाठी सुरू ठेवला जाणार आहे. या दिवशी दरड काढण्याचे काम बंद ठेवण्यात येइल.” – दीपक संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी