Delhi Fire Accident| दिल्लीतील विवेक विहार परिसरातील एका बेबी केअर सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही बालक जखमी झाले आहेत. सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेत आतापर्यंत 12 बालकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यापैकी 5 बालकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
#UPDATE | A total of 12 children were rescued, out of which 6 have died, 1 is on the ventilator and 5 others are admitted to the hospital: Delhi Fire Service
A massive fire broke out at a New Born Baby Care Hospital in Vivek Vihar late last night. https://t.co/byEpTHfopm
— ANI (@ANI) May 26, 2024
नेमकं काय घडलं?
दिल्लीतील विहार परिसरात एक बेबी केअर सेंटर आहे. या सेंटरमध्ये अनेक बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास बेबी केअर सेंटरला अचानक आग लागली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. परंतु क्षणार्धातच आगीने भीषण रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. परंतु यात सहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. Delhi Fire Accident|
हेही वाचा: