Lok Sabha Election : पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी दि.13 मे रोजी मतदान पार पडले. शिरूर लोकसभा मतदारसंघात 32 उमेदवार असून महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील तर महाआघाडीकडून डाॅ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख लढत आहे. मतदारसंघात 2019 मध्ये 59.37 टक्के मतदान झाले होते. तर यंदाच्या वर्षी पाच वाजेपर्यंत शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान झाले आहे.
मात्र, अश्यातच डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. मतदारांना पाचशे रूपये देऊन मतांची खरेदी केली असा आरोप त्यांनी केला आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विटमधून हा आरोप केला आहे.
📍ठाकरवाडी (शिरोली, खेड)
500 रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही!
असो, मायबाप जनता सुज्ञ आहे, मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ… pic.twitter.com/ZIgtlWJwDJ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2024
ते म्हणाले की, ‘शिरोली, खेड ठाकरवाडी असे कॅप्शन देत त्यांनी मतदारांना ५०० ची नोट देतांनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ५०० रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
असो, मायबाप जनता सुज्ञ आहे, मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना शिकवतील, असे म्हणत विरोधकांना खोचक टोलाही लगावला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय केले आहेत.
अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील लढत –
शिवाजी आढळराव पाटील यांनी 2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना पक्षातून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली.
त्यात त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत दिसून येत आहे.