‘कपिल शर्मा शो’ मधून घराघरात पोहचलेली गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) व संकेत भोसले लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकताच सुगंधाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीत मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम झाला. या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुंगधा आणि संकेतने 15 ऑक्टोबरला ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली. तेव्हापासून सुगंधा व संकेत चांगलेच चर्चेत आहेत. सुगंधाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाच्या कार्यक्रमदरम्यान ओटी भरण्यासह पूजाअर्चा हे सर्व महाराष्ट्रीयन परंपरेनुसार झाले. यावेळी काही मजेशीर खेळ खेळण्यात आले. हा कार्यक्रम दोघांनी खुप एंजॉय केल्याचे दिसते.
View this post on Instagram
डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करताना सुंगधा आणि संकेतने पोस्टमध्ये लिहिले, “आमच्या बाळाच्या येण्याचे सेलिब्रेशन साजर करतोय. आम्ही पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने (डोहाळे जेवण) सर्व विधी केल्या. ओटी भरणे, पूजा, बर्फी-पेड्याचा खेळ, धनुष्यबाण, केक कापणे, डायपर बदलणे असे मजेदार खेळ देखील झाले.” यावेळी एका स्पेशल गाण्यावर सुंगधा आणि संकेतने परफॉर्म देखील केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुंगधाने पतीसोबच काही रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यात ती तिचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. सुगंधाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पतीसोबत समुद्र किनाऱ्यावर दिसली. यावेळी दोघांनीही एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या होत्या.