नवीदिली – काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात चाललेली ही यात्रा विविध राज्यांमधून आपला प्रवास करत जल्लोषात सुरु आहे. सर्वसामान्यांचा या यात्रेला मिळणार प्रतिसाद पाहता काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना ही यात्रा काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी ज्या प्रदेशात जातात तेथील संस्कृती आणि भाषेत मिसळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
पुढील काही फोटोजच्या माध्यमातून आपण राहुल गांधींचा असाच काहीसा हटके अंदाज पाहणार आहोत. भारत जोडो यात्रेतील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोमध्ये राहुल गांधी व्हील चेअरवर असलेल्या व्यक्तीसोबत चालताना दिसत आहेत.
राहुल गांधी आणि विजेंदर सिंह यांचा जबरदस्त अंदाज असलेला हा फोटो भारत जोडो यात्रेतीलच आहे. विजेंदर सिंह हे प्रसिद्ध बॉक्सरपटू आहेत.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी बुलेट चालवण्याचा देखील आनंद घेतला त्यावेळेसच हा फोटो आहे.