रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनी ‘पीएमपी’ला भरघोस उत्पन्न

पिंपरी – यंदा 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाला मोठा फायदा झाला आहे. शहरातील तीनही आगाराच्या दैनंदिन महसूलामध्ये 5 लाखांपर्यंतची भर पडली आहे. भोसरी, निगडी व नेहरुनगर आगारांना मिळून एकूण 42 लाख रुपयांचे उत्पन्न एकाच दिवशी मिळाले आहे.

पीएमपीच्या पिंपरी-चिंचवड शहरातून विविध मार्गावर जवळपास पाचशे बस सोडण्यात येतात. 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनानिमित्त पीएमपीने दररोजच्या संचलनाच्या बससोबतच अतिरिक्‍त 120 बसचे नियोजन करण्यात आले होते. निगडी आगारातून गुरुवारी विविध मार्गावर 90 बस सोडण्यात आल्या. त्या माध्यमातून 16 लाख 56 हजारांचे एका दिवसाचे उत्पन्न निगडी आगाराला मिळाले असून, ते शहरात सर्वाधिक आहे. नेहरुनगर येथील आगाराला 11 लाख 81 हजार रुपयांचे तर भोसरी आगाराला 15 लाख रुपयांचे उत्पन्न एकाच दिवशी मिळाले. सुटीचा दिवस आणि प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी अतिरीक्‍त 9 फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.