दिघी-आळंदी परिसरातील विविध रस्त्यावर अवैध धंदे

बोपखेल : दिघी-आळंदी रस्त्यावर अवैध व्यवसाय मोठ्या सुरू आहे. मॅंग्झीन चौकात दिवसाढवळ्या अवैध व्यवसाय सुरू आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहे. दिघी-आळंदी रस्ता हा पालखी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. या मार्गाला अनन्य साधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्‍वर माऊली देवस्थान देखील काही अंतरावर आहे. तसेच साई मंदिर देखील याच मार्गावर आहेत. विशेष म्हणजे पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावरच आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

या संदर्भात दिघी येथील नागरिकांमध्ये अवैध व्यवसायाबाबत संताप व्यक्‍त होत आहे. याबाबत दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते धनेश आल्हाट यांनी अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत, यासाठी दिघी पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे. परंतु अद्यापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. या परिसरातील अवैध व्यवसाय आठ दिवसांच्या आत बंद न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.