ज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी विजेते

पुणे – अशोक केदारी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेया कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी कासम शेख यांचा 25-24, 25-23 असा पराभव केला. ही स्पर्धा सिंहगड रोड परिसर ज्येष्ठ नागरिक कॅरम क्‍लबतर्फे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत 110 खेळाडू सहभागी झाले होते. उपांत्य फेरीत केदारी यांनी रामचंद्र भागवत यांच्यावर 25-23, 25-20 असा विजय मिळविला. त्यांनी उपांत्य व अंतिम सामन्यात रिबाउंड, कटरिटन आदी तंत्राचा सुरेख खेळ केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भागवत यांनी शाम जगताप यांचा पराभव केला. पारितोषिक वितरण समारंभ प्रसाद जोग यांच्या हस्ते झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.