विद्यार्थ्यांचा अंधश्रद्धेला विरोधाचा संकल्प

अंनिसचे मार्गदर्शन ः प्रेरणा माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम

चिंचवड – अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे थेरगाव येथील प्रेरणा कनिष्ठ महाविद्यालयात “वैज्ञानिक दृष्टीकोन व प्रश्‍न तुमचा, उत्तर दाभोलकर यांचे’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला थारा न देण्याचा संकल्प केला. प्रेरणा कनिष्ठ महाविद्यालय येथे ग्रंथ दिंडी, अंनिसमार्फत “वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रश्‍न तुमचे उत्तर दाभोळकर यांचे’ हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्राचार्या शुभांगी इथापे यांच्या हस्ते झाले. समितीचे विज्ञान उपक्रम कार्यवाह विजय सुर्वे व सचिव एकनाथ पाठक यांनी यामध्ये मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रश्‍नांची उत्तरे मिळाली.

यानंतर चमत्कार व त्यामागील विज्ञान हा सहप्रयोग कार्यक्रम झाला. यातील अनेक प्रयोग ही साधी सोपी असतात पण बाबा, बुवा त्याला दैवी शक्ती सांगून लोकांना भुलवतात. अंनिसने आतापर्यंत शेकडो बुवा बाबांचा पर्दाफाश कसा केला, याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी समितीची माहिती व जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रा. पी. एस. पाटील, प्रा. ए. के. शेख, प्रा. ए. एस. पाटील यांनी मेहनत घेतली. यावेळी समितीचे राम नलावडे, राधा वाघमारे, रविंद्र बोरलीकर, सुभाष सोळंकी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.