तळेगाव दाभाडे – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांविरोधात “आघाडी-बिघाडी’ या फेसबुक पेजवरून मोहीम राबविली जात आहे. यातून नेत्यांची बदनामी करण्यात येत आहे. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असे “कॅम्पेन’ राबवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत आहेत. याला वेळीच आवर घालण्यासाठी पेज ऍडमिनवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.