पुणे – विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी राज्यभरातील 10 हजार 538 एस.टी बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, सोलापूर व नाशिक विभागांसाठी सर्वाधिक बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.
मतदान दि.21 रोजी आहे. मात्र, दि.20 रोजी मतदान केंद्रांवर मतपेट्या पोचणे आवश्यक असते. त्यामुळे दि.20 आणि 21 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी एकूण 5 हजार एस.टी. बसेस निवडणूक कामासाठी व्यस्त राहणार आहेत.
यामध्ये सर्वाधिक सोलापूर विभागासाठी 1,341, पुणे-809, नाशिकसाठी 509 तर मुंबई व ठाण्यासाठी 388 बस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसांसाठी 540 बस आरक्षित आहेत. निवडणुकीचे साहित्य, कर्मचारी, पोलीस, निवडणूक अधिकारी यांना वेळेत पोहचविण्यासाठी बसेसचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्याने मतदानादिवशी ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.