पळसदेव -पळसदेव गावात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण आहे. सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना गावातील एल जी बनसुडे स्कूल येथे विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
मात्र या रुग्णांना औषधोपचार खासगी डॉक्टरांकडून करून घ्यावा लागत आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजकारण आणल्यामुळे सुविधा बंद झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे. विलगीकरण कक्षातील राजकारण थांबवून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्रति नागरिकाला दहा दिवसांसाठी 6 हजार रुपयाचे औषधे घ्यावी लागत आहेत. त्यामुळे विलगीकरण कक्षात नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिस्थिती बेताची असलेले नागरिक सध्या त्रस्त आहेत.