सलमान खानचा “राधे’ ठरल्याप्रमाणे ईदला रिलीज झाला. त्याचप्रमाणे अक्षय कुमारचा “सुर्यवंशी’ आणि “बेलबॉटम’ स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर म्हणजे 15 ऑगस्टला रिलीज होईल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
सध्या लागू असलेला लॉकडाऊनदेखील तोपर्यंत शिथील झालेला असेल. म्हणून अक्षयचे चाहते त्याच्या या दोन्ही सिनेमांची आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच दरम्यान अक्षयने एक खुलासा केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे.
‘स्वातंत्रय दिनाच्या निमित्ताने माझे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होतील, असे या निमित्ताने सांगणे योग्य ठरणार नाही. चित्रपटाचे निर्माते रिलीज डेटवर काम करत आहेत. “सूर्यवंशी’ आणि “बेलबॉटम’ यांच्या रिलीजची तारीख वेळ योग्य असताना जाहीर होईल, असे अक्षयने म्हटले आहे.
त्यामुळे या दोन्ही सिनेमांच्या रिलीजबाबतचे तर्कवितर्क थांबण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्याचे हे दोन्ही सिनेमे रिलीज होणार नाहीत, असे आता गृहित धरूनच चालावे लागणार.
“सुर्यवंशी’ आणि “बेलबॉटम’ व्यतिरिक्त अक्षय सध्या “रामसेतू’चे शुटिंग करतो आहे. त्याच्या “अतरंगी रे’चे शुटिंग संपले आहे. त्याशिवाय “बच्चन पांडे’, “रक्षाबंधन’ आणि “पृथ्वीराज’मध्येही अक्षय काम करतो आहे.