कोल्हापूर – कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या शिरोली पुलाची परिसरात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. गणेश नामदेव लोहार या 25 वर्षीय तरुणाचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनेने पुलाची शिरोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गणेश प्लंबर काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थळी शिरोली एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस तसेच ठसे तज्ञ दाखल झाले आहेत. नेमका हा खून कोणत्या कारणासाठी केला गेला आणि कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत.